संस्थेबद्दल
 
   संस्थेविषयी थोडक्यात : "माणगंगा परिवार" हे फक्त नाव नाही तर विश्वासाचे प्रतीक आहे.. संस्थेचे संस्थापक श्री नितीन (आबासाहेब) इंगोले हे असून त्यांनी कृषी विषयातील पदवीत्तर पदवी (M.Sc.(Agri.) घेतली आहे.तसेच गेले 15 वर्षे बँकिंग क्षेत्रात कार्यरत असून ब्रांच बँकिंग ते हेड ऑफिस अश्या विविध पातळीवर कामकाज करून आपल्या कार्याचा ठसा उमठविला आहे..त्यांनी बँकिंग क्षेत्रातील CAIIB, Certified Credit Officer अशी विविध निपुणतां प्राप्त केली आहे. बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा समाजातील सर्व सामान्यांना व्हावा ह्या हेतूने माणगंगा परिवार अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सांगोला या संस्थेची स्थापना केली..आपल्या सांगोला तालुक्यातील शाखेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अल्पावधीतच मंगळवेढा येथे दुसरी शाखा चालू केली आहे.आमची संस्था पारदर्शक कारभार,ठेवीचे आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठ्यासाठी सभासदांमध्ये ओळखली जाते.मोबाईल बँकिंग,IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी आमची संस्था प्रसिद्ध आहे.. तसेच बँकेतील सर्व स्टाफ आनंदाने विनम्र आणि तत्पर सेवा देत आहोत. सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आपल्या संस्थेने अल्पावधीतच खुप मोठी अशी गरुड झेप घेतली आहे. "आपला परिवार माणगंगा परिवार" हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही प्रत्येक घरासाठी,घरातील प्रत्येकासाठी माणगंगा परिवार ही हक्काची संस्था असेल असे आमचे व्हिजन राहील... .. ​