कालावधी मासिक रक्क भरणारी रक्कम मिळणारी रक्कम
6 वर्ष 1000 720000 100000
7 वर्ष 1650 138600 200000
8 वर्ष 2000 192000 300000
9 वर्ष 2250 243000 400000
10 वर्ष 2350 282000 500000
ठराविक कालावधी साठी या योजनेत दर महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करुन तुम्हाला लखपती होता येते. ही योजना तुम्ही मुलाच्या शिक्षणासाठी अथवा एखाद्या उद्देशासाठी काढू शकता. कालावधी नंतर व्याजासहित मिळणारी रक्कम तुम्हाला लखपती करेलच, पण तुम्हाला ज्या कामासाठी ही रक्कम हवी आहे, त्यात ही मोठा आर्थिक हातभार लागेल.
दर महिन्याला काही ठराविक रक्कम तुम्ही ठराविक कालावधीसाठी आमच्याकडे ठेऊ शकता, या कालावधी नंतर तुम्हाला मुद्दल व त्यावरील व्याज अशी रक्कम मिळते. या योजनेत गुंतवणूक म्हणजे शिस्तीत बचत होते व भविष्यात आपल्याला एक मोठी रक्कम मिळते.
कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द,विश्वास त्यासोबत दाम पण मोठे हवे ,आपण केलेल्या कष्टांचा फायदा तर आपल्याला होतोच. पण आम्ही दुप्पट फायदा करून देऊ ते ही फक्त 72 महिन्यात . माणगंगा परिवार च्या दामदुप्पट योजनेत गुंतवणूक करा आणि आपल्या स्वप्नाला साकार करा.
अगदी नावाप्रमाणेच, मालमत्ता तारण कर्ज (लोन अगेंस्ट प्रॉपर्टी – एलएपी) हे स्व-मालकीची मालमत्ता गहाण ठेवून मिळविलेले कर्ज असते. मालमत्तेच्या बाजारमूल्याच्या विशिष्ट टक्केवारीनुसार हे कर्ज निश्चित केले जाते. एलएपी हे खात्रीदायी कर्ज विभागामध्ये मोडते, जेथे कर्जदार त्याच्या मालमत्तेचा वापर सुरू ठेवत अप्रत्यक्ष तारण म्हणून करतो. अनेक व्यक्तींसाठी मालमत्ता कर्ज हा सर्वात सुलभ पर्याय असू शकतो. यातून लघुकालीन व्यवसाय गरजा किंवा विवाह, उच्च शिक्षण, सुट्टीमधील योजना आणि अगदी वैद्यकीय आणीबाणीच्या गरजांसाठी आणि महागडे कर्ज फेडण्यासाठीही आíथक व्यवस्था या रूपात करता येतो.
सोने तारण म्हणजे जेव्हा तुम्हाला जेव्हा आर्थिक गरज असते तेव्हा तुमच्या जवळ असलेले सोने तुम्ही न मोडता त्यावर कर्ज काढू शकता. यास सुवर्ण कर्ज म्हणतात. माणगंगा परिवार मध्ये सोने तारण कर्ज करणे म्हणजे सोने पे सुहागा....अत्यंत अल्प दरामध्ये सोने तारण कर्ज उपलब्ध
आमच्या व्यवसाय वाढीच्या कर्जासह, आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे रहा आणि आपला व्यवसाय एका त्रासमुक्त वातावरणात वाढवा. माणगंगा परिवार क्रेडिट सोसायटी च्या अतिरिक्त आर्थिक मदतीने ह्यास नवीन उंचीवर न्या. तुमच्या मार्गात असलेल्या प्रत्येक पावलावर तुम्हाला सहायता देण्यासाठी आम्ही तयार आहोत, कारण आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. आम्ही तुमच्या प्रत्येक व्यवसायाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्रतिस्पर्धी व्याज दर, लवचिक कार्यकाळ आणि किमान डॉक्यूमेंटेशनसह आमच्या व्यवसाय वाढीच्या कर्जाची काळजी घेतो.
कुठलाही व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागते. त्या साठी आम्ही आपल्याला मदत करू.. शेती शी निगडीत व्यवसायासाठी आपल्यालाआम्ही कर्ज देऊ. दुग्ध व्यवसाय अधिक प्रगत बनवण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा